ओल्याचिंब अंगाने ती मला चिकटून बसल्यानंतर क्षणभर सगळ्या गोष्टींचा विसर पडला. त्यात पावसाच्या बारीक सरी चालूच. तोंडावर पाण्याचे थेंब लागत असल्याल्यामुळे अंग आकसून घेऊन ती माझ्या मागे लपली. नाकातून पाणी टपकु लागलं. चिखलाचे शिंतोडे उडून ड्रेस राड झालेला. अंगाला ड्रेस चिकटल्यामुळे सगळं पाणी पाणी. नशीब तिने आतमधून स्लीप घातलेली नाहीतर सगळाच पचका झाला असता. माझेही हाल काही वेगळे नव्हते. टी शर्ट पूर्णपणे भिजलेला. गाडी चालवताना कुडकुडू लागलो... तिने माझ्या टी शर्टच्या आतमध्ये हात टाकला तसा मी एकदम शहारलो. काहीच सुचलं नाही. फक्त तिचा स्पर्श. हात पोटावरून छातीकडे सरकला तसा माझाही तोल ढासळत होता. वेगळीच जादू. हरवून गेलो त्यात. पूर्णपणे भिजलीयस तू. थांबुयात का आपण. अशाने सर्दी होईल. लेणी जवळच आल्यामुळे आम्ही तसचं जाण्याचं ठरवलं. अगदीच चिकटून बसल्यामुळे डाव्या डोळ्याच्या कोपर्यातून तिचा पाय मला दिसला. गुडघ्यापासून खाली पाणी ओघळत होत. ड्रेसचं कापड पोटर्याना चिकटलेलं. पायातला काळा दोरा त्या गोर्यापान रंगावर उठून दिसला. बोटं आकडून घेतलेली. अंगठ्याची उरलेल्या बोटांशी सततची चुळबुळ. मोह आवरला नाही म्ह...