ओल्याचिंब अंगाने ती मला चिकटून बसल्यानंतर क्षणभर सगळ्या गोष्टींचा विसर पडला. त्यात पावसाच्या बारीक सरी चालूच. तोंडावर पाण्याचे थेंब लागत असल्याल्यामुळे अंग आकसून घेऊन ती माझ्या मागे लपली. नाकातून पाणी टपकु लागलं. चिखलाचे शिंतोडे उडून ड्रेस राड झालेला. अंगाला ड्रेस चिकटल्यामुळे सगळं पाणी पाणी. नशीब तिने आतमधून स्लीप घातलेली नाहीतर सगळाच पचका झाला असता. माझेही हाल काही वेगळे नव्हते. टी शर्ट पूर्णपणे भिजलेला. गाडी चालवताना कुडकुडू लागलो...
तिने माझ्या टी शर्टच्या आतमध्ये हात टाकला तसा मी एकदम शहारलो. काहीच सुचलं नाही. फक्त तिचा स्पर्श. हात पोटावरून छातीकडे सरकला तसा माझाही तोल ढासळत होता. वेगळीच जादू. हरवून गेलो त्यात. पूर्णपणे भिजलीयस तू. थांबुयात का आपण. अशाने सर्दी होईल. लेणी जवळच आल्यामुळे आम्ही तसचं जाण्याचं ठरवलं. अगदीच चिकटून बसल्यामुळे डाव्या डोळ्याच्या कोपर्यातून तिचा पाय मला दिसला. गुडघ्यापासून खाली पाणी ओघळत होत. ड्रेसचं कापड पोटर्याना चिकटलेलं. पायातला काळा दोरा त्या गोर्यापान रंगावर उठून दिसला. बोटं आकडून घेतलेली. अंगठ्याची उरलेल्या बोटांशी सततची चुळबुळ. मोह आवरला नाही म्हणून पायांना हात लावला तर तिने छातीत नख रुतवला. आई गं.. दुखलं यार. कशाला वाढवलेत इतके नख...
एकदाच्या लेणी आल्या आणि पार्किंग मध्ये आम्ही गाडी लावली. उतरल्या उतरल्या तिने पहिल्यांदा ड्रेस नीट केला. बांधलेले केस मोकळे सोडले. भिजल्यामुळे कुरळे वाटत होते. एकमेकात अडकलेले. गाडीच्या आरशामध्ये चेहरा पाहिला. ब्यागेतून लिपस्टिक काढली आणि हलकीशी ओठांना लावली. भिजलेला चेहरा अगदीच फ्रेश त्यात ओठांनी चार चांद लावले. ड्रेस जरा जास्तच अंगाला चिकटलेला म्हणून तिने खांद्यावरून स्टोल घेतला. जवळ आली आणि माझा हात हातात घेतला. चल म्हणाली. “तुला माहितेय किती सुंदर दिसतीयेस तू. आजपर्यंत मुव्ही मध्ये वगैरे पाहिलेलं की भिजल्यावर मुलगी खूपच सुंदर दिसते. आज प्रत्यक्ष दर्शन झालं.” तशी लाजली. “तुझं आपलं काहीही असतं. तुझीच आहे कायमची. पुरे आता कौतुक. चल”....
चालत असताना तळहातावर ती सतत नख फिरवायची. आधीच पावसाने वातावरणात गारठा पसरलेला त्यात लेणी म्हणजे अजूनच थंड. पाहिल तिकडे अद्भुत सौंदर्य. खोल गुहेत जावं तसं वाटलं. हलकसं बोललं तरी आवाज घुमायचा. ती माझ्या हळूच कानात कुजबुजायची. अचानक गालावर तिने किस केली. मला कळालंच नाही. एवढी खोडकर असेल वाटलंही नव्हतं. मी तिच्यामागे पळालो तेवढ्यात लोकांमध्ये मिसळायची. थोड्यावेळाने पुन्हा जवळ यायची. एकमेकात करंगळी गुंतलेल्या.
कोणी नाही बघून तिला कचकन जवळ ओढलं. टपोर्या डोळ्यांमध्ये फक्त माझा चेहरा दिसला. हात तसाच कंबरेमागे पकडला. सोडवण्यासाठी तिने हलकासा जोर लावला पण मी पकड अजूनच घट्ट केली. तिने चेहरा फिरवला तसे कानापासून मानेवर पसरलेले ओले केस डोळ्यासमोर आले. उजव्या हाताने अलगद त्या केसांना बाजूला सारल. तिने डोळे बंद केलेले. ओठांनी मानेवर स्पर्श केला. तिने घट्ट मिठी मारली. श्वासोश्वास वाढलेला. मला जाणवला तो. माझ्या मानेभोवती हात घट्ट आवळलेले. भिजलेल्या कंबरेवर अलगद दोन्ही हात ठेवले तसा तिने एक पाय माझ्या पायावर ठेवला. थोड्यावेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवलो...
लेणी पाहून बाहेर पडलो तसे इंस्टंट फोटो काढणारे समोर आले. पन्नास रुपयात एक कॉपी. फोटोसाठी पोज दिली तर फोटोग्राफर म्हणे अजून जवळ या. खांद्यावर हात ठेवा. अरे तुझीच गर्लफ्रेंड ना. जवळ घेऊन थांब की मग. ती बारीक हसली. मला कसलं अवघडल्यासारखं झालेलं. येणारे जाणारे लोकं उगाच वळून वळून पहायचे. कुत्सित हसायचे. एखादं प्रेमी जोडपं दिसलं की फुकटचा राग येतो यांना. दोन पोरंं झाली तरी तरण्या पोरींकडे डोळे वासून बघितलेलं चालतं पण एखादं कपल दिसलं की सभ्यता आठवते. आजूबाजूची भुरटी पोरं मुद्दामून कपल्स ची छेड काढणार. शिव्या देणार. तिच्याकडे कोणी खालून वरपर्यंत बघितलेलं मला सहन होत नव्हतं. तोंडाचे अश्लील हावभाव. भुक्कड साले...
तिथून निघण्याचा आम्ही निर्णय घेतला. भूक लागलेली. वाटेत एखाद्या ढाब्यावर जेवायचं ठरलं. संध्याकाळच्या आधी तिला घरी देखील सोडायचं होतं. जाताना पायथ्याशी एक तळं लागतं. जेवण झाल्यानंतर तिथे थोड्यावेळ जाऊन बसुयात. असंख्य कपल असतात. छान फोटो देखील काढता येतील. हातात हात घेऊन शांत बसता येईल. चला तर मग आता निघुयात, परतीच्या प्रवासाला...थंडाव्यातील उब मनात साठवून.
- अभिनव ब. बसवर

Comments
Post a Comment