Skip to main content

कधी आठवण नाही येत त्याची ?

कधी आठवण नाही येत त्याची ?
येते तर, आठवण कशी नाही येणार. माझ्या तरुणपणातील कित्येक वर्षं मी त्याच्यासोबत घालवलीयेत. पुरूषाचा पहिला स्पर्श त्याच्याकडूनचं अनुभवलाय. खूप छान होतं सगळं. विकेंड ला फिरायला जाणं, रात्री उगाच सगळे रस्ते फिरणं, त्याच्यासोबत रस्त्यावर ओरडणं, कधी गुपचूप दारू आणणं, रुमवर जाऊन दोघांनीचं पिणं, त्यानंतर एकमेकांचा हवाहवासा सहवास अनुभवनं, दररोज काहीतरी वेगळी पोजिशन ट्राय करणं. आम्ही दोघंही सेक्स च्या बाबतीत शौकीन होतो. प्रत्येक क्षण मेमरेबल कसा जगता येईल याचं दोघांनाही भान असायचं. कधी कधी पोर्न फिल्म्स लँपीवरती प्ले करूनसुद्धा आम्ही सेक्स ट्राय करायचो. वेगळीच मजा होती ती. 

त्याचा १ बीएचके होता. पुण्यात सोफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला, उत्तम कमवायचा. वेल सेटल्ड. मी पीजी राहायचे, ईथेचं पर्वतीला. कंपनीच्या कामानिमित्त ओळख झाली, कधी एकमेकांना आवडू लागलो लक्षातच नाही आलं. दिसायला स्मार्ट, कोणतीही मुलगी लगेच प्रेमात पडावी असाच होता. माझा जाँब वेल सेटल्ड झाल्यानंतर लग्न करायचं ठरवलं. उत्तम पार पडलं. सुरुवातीला थोडा आला प्रोब्लेम. मी पक्की मराठी घरातील. तो मुळचा राजस्थानी. आईचा नकारच होता. बाबांनी समजावलं, त्यानंतर कुठे तयार झाली ती.  

स्नेहल, सगळंच तर छान होतं, प्लीज डोन्ट माइंड...पण एक विचारू ?
मला माहितेय तुला काय विचारायचंय, वेगळे का झालात ? असं काय झालं की घटस्फोट घेऊ वाटला,.. हेच ना?
( मी फक्त होकारार्थी मान हालवली. चहाचा एक घोट घेतला आणि तिच्या उत्तराची वाट पाहू लागलो.)


आदित्यची यात काही चूक होती असं मला कधीच नाही वाटलं. खरतर मीच लहान होते. तो फार मँच्युअर्ड होता रे. माझ्यापेक्षा ५ वर्षांनी मोठा. लग्न झालं तेव्हा मी २३ चो होते. त्यावेळी मला जे हवं होत ते सगळचं त्याच्याकडून मिळालं. नुसतं शरीर नाही तर इमोशनल सपोर्ट, आधार सर्व काही. छोटी मुलगी होते रे मी. माझा प्रत्येक हट्ट पुरवायचा तो. माझंच मन फुलपाखरासारखं.

जोश मध्ये लग्न केलं मी, पण निभवता येईल का नाही भीती वाटायची. त्यानं कोणतीच बंधनं कधीच घातली नाहीत. मला हवं तसं जगू द्यायचा. कदाचित मीच कुठेतरी गैरफायदा घेतला.

अगदी एखाद्या टिपीकल संसारी पुरुषाप्रमाणे वेळेत ऑफिस ला जाणं, वेळेत घरी येणं. मला हळू हळू कंटाळा यायला लागला अरे या रुटीन चा. रिलेशनमध्ये सुरुवातीला असणारं नवपण संपल की काय असं वाटू लागल. तो थकून घरी यायचा, लगेच झोपायचा. नाहीतर कामं चालूच असायची. करीयर मध्ये पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी त्याचा सगळा स्ट्रगल सुरु होता. स्वतःचा बिजिनेस सेटअप तयार करायचा होता त्याला. 
त्याच्या या जगात मला जागा होतीच रे. पण माझा रोल काहीच नव्हता...

मला जे हवं होतं, ते मला मिळत नव्हतं.. त्यामुळे सतत ते शोधण्याची माझी धडपड चालू होती. जे मी घरात शोधत होते ते एका क्षणी मला बाहेर मिळालं. थांबवू नाही शकले स्वतःला. आदित्यचा विचार आला नाही असं नाही, पण ते हवं होतं मला. 
एकदिवस त्याला सगळं खरं सांगितलं. नेहमीप्रमाणेच काहीही रिअँक्ट झाला नाही. खरंतर मला वाटत होतं, त्याने रिअँक्ट व्हावं. मला ओरडावं.... पण तसं काहीच झालं नाही.

शेवटी मीच सगळं संपवण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही तो शांतच राहिला..... पहिल्यापासून होता तसाचं, माझा प्रत्येक हट्ट पुरवणारा....

- अभिनव ब. बसवर 

(फोटो प्रतिकात्मक आहे)


Comments

Popular posts from this blog

तिच्यासोबतची पहिलीच ट्रीप : भाग १

मोठ्या मुश्किलीनं ती माझ्यासोबत फिरायला यायला तयार झाली. मुळची इथलीचं असल्यानं बाहेर पडायचं म्हणलं तरी कोणीतरी बघेल याचं टेंशन असायचं. तोंडाला स्टोल गुंडाळूनचं यायची. थोडासा खाली कर म्हणलं तरी ऐकायची नाही. नको कोणीतरी पाहिलं तर नसती लफडी मागे लागतील. इतकी सुंदर दिसते पण प्रत्यक्ष चेहर्याचं दर्शन विरळचं. माझं मन राखण्यासाठी हळूच स्टोल खाली करते तेव्हा नाकावर बारीकसा व्रण दिसतो. चेहऱ्यावर थोडीसुद्धा धूळ नाही. डोळे कोरल्यासारखे वाटतात, ओठ अगदी चमकतात. बोलताना तिच्या जिभेच्या शेंड्यावरचं माझं लक्ष. मुद्दामूनचं मी आईस्क्रीम पार्लरला भेटायचं ठरवतो कारण, का कुणास ठाऊक ती जीभ जास्त मोहात पाडते.... लेणी पाहायला जायचं ठरलं. माझा रुममेट सोबत यायला तयार झाला. कारण इतक्या लांब जायचं तर कोणी सोबत हवंच. दुसर्यादिवशी सकाळी सातला निघायचं होतं. रात्रभर जागण्याची घाण सवय.त्यात आम्ही दोघ रात्री लँपीवर मुव्ही पाहत बसलो. सकाळी कुठली लवकर जाग येतेय. तिचाच उठवण्यासाठी कॉल आला. ताडकन उठलो. चार मग अंगावर ओतले आणि भसाभस परफ्युम मारला. ठरल्या वेळेच्या आधी सितारा चौकात पोहचलो. चहा घेतला. मित्राने सकाळ सकाळी सिग...

तिच्यासोबतची पहिलीच ट्रीप : भाग ३

ओल्याचिंब अंगाने ती मला चिकटून बसल्यानंतर क्षणभर सगळ्या गोष्टींचा विसर पडला. त्यात पावसाच्या बारीक सरी चालूच. तोंडावर पाण्याचे थेंब लागत असल्याल्यामुळे अंग आकसून घेऊन ती माझ्या मागे लपली. नाकातून पाणी टपकु लागलं. चिखलाचे शिंतोडे उडून ड्रेस राड झालेला. अंगाला ड्रेस चिकटल्यामुळे सगळं पाणी पाणी. नशीब तिने आतमधून स्लीप घातलेली नाहीतर सगळाच पचका झाला असता. माझेही हाल काही वेगळे नव्हते. टी शर्ट पूर्णपणे भिजलेला. गाडी चालवताना कुडकुडू लागलो... तिने माझ्या टी शर्टच्या आतमध्ये हात टाकला तसा मी एकदम शहारलो. काहीच सुचलं नाही. फक्त तिचा स्पर्श. हात पोटावरून छातीकडे सरकला तसा माझाही तोल ढासळत होता. वेगळीच जादू. हरवून गेलो त्यात. पूर्णपणे भिजलीयस तू. थांबुयात का आपण. अशाने सर्दी होईल. लेणी जवळच आल्यामुळे आम्ही तसचं जाण्याचं ठरवलं. अगदीच चिकटून बसल्यामुळे डाव्या डोळ्याच्या कोपर्यातून तिचा पाय मला दिसला. गुडघ्यापासून खाली पाणी ओघळत होत. ड्रेसचं कापड पोटर्याना चिकटलेलं. पायातला काळा दोरा त्या गोर्यापान रंगावर उठून दिसला. बोटं आकडून घेतलेली. अंगठ्याची उरलेल्या बोटांशी सततची चुळबुळ. मोह आवरला नाही म्ह...