मोठ्या मुश्किलीनं ती माझ्यासोबत फिरायला यायला तयार झाली. मुळची इथलीचं असल्यानं बाहेर पडायचं म्हणलं तरी कोणीतरी बघेल याचं टेंशन असायचं. तोंडाला स्टोल गुंडाळूनचं यायची. थोडासा खाली कर म्हणलं तरी ऐकायची नाही. नको कोणीतरी पाहिलं तर नसती लफडी मागे लागतील. इतकी सुंदर दिसते पण प्रत्यक्ष चेहर्याचं दर्शन विरळचं. माझं मन राखण्यासाठी हळूच स्टोल खाली करते तेव्हा नाकावर बारीकसा व्रण दिसतो. चेहऱ्यावर थोडीसुद्धा धूळ नाही. डोळे कोरल्यासारखे वाटतात, ओठ अगदी चमकतात. बोलताना तिच्या जिभेच्या शेंड्यावरचं माझं लक्ष. मुद्दामूनचं मी आईस्क्रीम पार्लरला भेटायचं ठरवतो कारण, का कुणास ठाऊक ती जीभ जास्त मोहात पाडते....
लेणी पाहायला जायचं ठरलं. माझा रुममेट सोबत यायला तयार झाला. कारण इतक्या लांब जायचं तर कोणी सोबत हवंच. दुसर्यादिवशी सकाळी सातला निघायचं होतं. रात्रभर जागण्याची घाण सवय.त्यात आम्ही दोघ रात्री लँपीवर मुव्ही पाहत बसलो. सकाळी कुठली लवकर जाग येतेय. तिचाच उठवण्यासाठी कॉल आला. ताडकन उठलो. चार मग अंगावर ओतले आणि भसाभस परफ्युम मारला. ठरल्या वेळेच्या आधी सितारा चौकात पोहचलो. चहा घेतला. मित्राने सकाळ सकाळी सिगारेट मारली... घरून निघालीये म्हणून तिचा मेसेज आलेला. चौकाच्या पलीकडच्या बाजूला एक रिक्षा थांबली. पूर्ण अंग झाकलेला पंजाबी ड्रेस, पाठीला बँग आणि नेहमीप्रमाणे तोंडाला स्टोल बांधून ती आली. या ड्रेसमध्ये जरा जास्तच उंच दिसते ना. फारच उठून दिसत होता रंग...
माझ्या गाडीवर आम्ही दोघं आणि मित्र त्याच्या गाडीवर असे आम्ही निघालो. सुरुवातीला दोन्ही गाड्या एकसोबत चालवत तिघांनी फार गप्पा मारल्या. हळूहळू माझी गाडी मित्राच्या गाडीच्या मागे कशी राहिली हे मलाचं कळालं नाही. बँग काढून मी समोर टाकीवर ठेवली. दोघांमध्ये उगाच ती डिस्टर्ब करत होती. आम्ही दोघं कधीही गाडीवर एकत्र फिरलो नव्हतो. ती नेहमीचं ठरलेल्या जागी रिक्षाने यायची. आज मात्र दोघांनाही चान्स मिळालेला. तिने दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. कसलं भारी वाटलं. सिटीच्या थोडे बाहेर आल्यानंतर तिने स्टोल काढला. मी आरश्यात पाहिलं. बापरे... किती सुंदर दिसतीये. सकाळीच धुतलेले केस,भुवयांच्या मधोमध एकदम छोटुशी चमकणारी बिंदी, बांगडीसारखं कानातलं आणि नितळ त्वचा. अगदी जन्नत. ते फिलिंग निव्वळ अप्रतिम...
खांद्यावरचे हात हळू हळू माझ्या छातीपर्यंत सरकले आणि त्यांनी वेटोळा घातला. पायांनी माझ्या मांड्याना घट्ट आवळलं. काही कळण्याच्या आत मानेवर ओठांचा स्पर्श जाणवला. अंगावर शहारे आले. थंड वार कानावर आदळत असूनसुद्धा तिच्या श्वासांनी मला आतल्याआत पूर्ण हादरवलं. मीदेखील डावा हात मागे सरकवून तिच्या मांडीवर ठेवला तशी तिची पकड अजूनच घट्ट झाली आणि ते ओठ पुन्हा मानेवर चिकटले. यावेळी तिने दात रुतवले पण थोडंदेखील दुखलं नाही. नेल आर्ट केलेल्या तिच्या नखांचं माझ्या शर्टशी खेळणं चालू होतं...
लघ्वी आली म्हणून मित्राने गाडी थांबवली. मीदेखील गाडी साईडला घेतली. तिलाही जायचं होतं. रस्त्यावर तशी वर्दळ नव्हती. मधून अधून एखादी चारचाकी पास व्हायची. रस्त्याच्या पलीकडे एक बांध दिसला. तिचा हात हातात घेतला आणि चल म्हणालो. बांधाच्या पलीकडे झाडी होती सगळी. तिची डेअरिंग होत नव्हती. कोणीतरी बघेल वगैरे. थोडंसं आत जा म्हणलं. मी आहे इथेच. पाठमोरा थांबलो. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री केली. तिला ग्रीन सिग्नल दिला...
बांध ओलांडून परत आलो तर मित्र हवा चेक करताना दिसला. आधीच नव्हती का रे करता येत. लक्षातच नव्हतं म्हणाला. थोडी कमी वाटतीये. पुढे भरून घेऊयात. आपापल्या गाडीवर आम्ही बसलो आणि निघालो. लेणी अजून ६२ किमी लांब होत्या....
#क्रमशः
- अभिनव ब. बसवर

Memserising as always,Waiting for next...
ReplyDeleteYour post are really very heart touching and realistic
ReplyDeletesunder......
ReplyDeleteJust superb..
ReplyDeleteN waiting for next...👍
abhi bhava ek no. ani link chi idea tar ekdam best...............
ReplyDeleteDada mst vatla vachun...Kahi athvani punha jagya zalya
ReplyDeleteतुझं क्रमशः...
ReplyDeleteम्हणजे गर्लफ्रेंडच्या msg ची वाट बघण्यासारखे झालयं ����
नवा महिना, नवी कहाणी, वेध लागले तुझ्या पुढील
ReplyDeleteलिखाणाचे