Skip to main content

तिच्यासोबतची पहिलीच ट्रीप : भाग २

बांधाच्या पलीकडे लघवीला बसल्यानंतर खरंतर मला जाम भीती वाटली. एकतर ती झाडी आणि एकसारखा किर्रर्र करणारा किड्यांचा आवाज. याआधी देखील लहानपणी आईवडिलांसोबत फिरायला वगैरे जायचे तेव्हा असचं उघड्यावरच बसावं लागायचं. पर्याय नसायचा. एकतर टोयलेट नसायची आणि तसंच थांबवून ठेवावं तर पोटात प्रचंड दुखायचं. नेहमी आई सोबत असायची. यावेळी हा पाठमोरा थांबलेला. विश्वासाचं नातं किती पटकन तयार झालं ना आमच्यात.सुमसाम रस्त्याला असं जास्त वेळ थांबणं बरं नाही म्हणून आम्ही निघालो...

ओढणी सारखी खाली सरकून चाकाकडे जायची म्हणून तिला गाठचं मारली. वैतागचं असतो या पंजाबी ड्रेसचा. ओढणी सांभाळा.पोटाजवळ नाडी रुतते आणि  सगळं लाल होऊन जातं. जिन्स घालणार होते पण या ड्रेसमध्ये मी जास्त छान दिसते. कानातलं वगैरे बिलकुल आवडत नाही. आई ओरडली तरी बिंदी लावत नाही पण आज याच्यासाठी तर इतकं आवरून आले. केसांना जेल लावण्याची याला फारच घाण सवय. कसले कडक होऊन गेलेत केस. हात टाकला तर उगाच विस्कटू नको म्हणतो. डोंबलाचे सेट केलेत. याला माझ्यासाठी साधं नटता येत नाही वाटतं. झोपेतून तसाच उठून आलाय. बड्डेला छानसा परफ्युम गिफ्ट करणार . कुठून आणलाय असला भंगार परफ्युम काय माहित. नाकामध्ये वास जाऊन डोकं जाम झालं सगळं...

मैत्रिणीच्या वाढदिवसाला चाललेय म्हणून घरी सांगितलेलं. इतकं आवरलेलं बघून शॉक बसला ना आईला.आमच्या भैय्याचा मध्येच चोमडा  प्रश्न, “नक्की मैत्रिणीकडेच चाललीये ना ?” याला नसत्या चौकश्या. बघेल तेव्हा नवीन पोरीसोबत फिरताना दिसतो. परवा तर सायलीने माँल मध्ये कुठल्यातरी पोरीसोबत पाहिलं. पिक्चरला गेलेला. गुडघ्यापर्यंत ड्रेस घालून आलेली. याचे सतराशे साठ नखरे पण माझ्यावर बारीक लक्ष. हा मुलगा कोण, तो कोण. जास्त मैत्री करू नको. असं नि तसं...


गाडीवर बसून बसून अंग दुखतं सगळं. त्यात याची स्पोर्ट्स बाईक. मागचं सीट नेमकं वर. घट्ट धरूनच बसावं लागतं. सारखी याच्यावर मी आदळायचे. पाठीत चमक भरू नये म्हणजे झालं. मानेवर किस केली तर अंग आकसून घेत होता. नाही तेव्हा फोनवर मला पाहिजे पाहिजे करतो. आता स्वतःहून किस करतेय तर लाजतो. मुलांचं हे असं असतंं. यांना समोरून चालत आलं तर घेऊ नाही वाटत. इतकं छान वातावरण. थंड वारं, आजूबाजूला झाडं सगळी. माणसाने प्रेमाच्या गप्पा माराव्यात ना. साहेब मित्रांशी झालेली भांडणं सांगत बसलेत. किती अरसिक बॉयफ्रेंड मिळाला रे देवा...

घाटाचा रस्ता लागला आणि आम्ही गाडी स्लो घेतली. समोरून एकदम बस वगैरे यायची. जवळ येईपर्यंत कळायचं नाही. एखादी कार चाटून ओव्हरटेक करून जायची. पावसाचे बारीक शिंतोडे लागत होते. मला भिजण्याचं टेंशन आलं. उगाच भिजले तर सगळा ड्रेस अंगाला चिकटून बसेल. एक चांगला स्पॉट दिसला आणि आम्ही थांबलो. चहाची टपरी आणि वडापावची गाडी होती. दोघांनी मस्त पत्र्याचं शेड टाकलेलं. पावसाचा जोर वाढला आणि पटकन आम्ही आडोशाला गेलो. मागच्या बाजूला खोल दरी होती. त्या स्पॉट वरून चार डोंगर एका रांगेत दिसायचे. पावसामुळे तर अजूनच भारी वाटत होतं ते. तीन चहा सांगितले सोबत वडापाव. पाव खाऊ की नको. परत पोटाचा त्रास व्हायचा. जाऊ दे, कोण रोज रोज येणार आहे. करूयात मस्त मजा. दाबून एक वडापाव खाल्ला. सोबत मिरची. डोळ्यातून पाणी नुसतं...

आ करून पावसाचे शिंतोडे जिभेवर पडतायत का, हा वेडेपणा देखील करून पाहिला. जास्तच थंडी वाजू लागली. मी ज्याकेट घातलं. मागून येऊन अचानक याने ज्याकेटच्या खिशात हात घातले. अलगद चिकटला अंगाला. वेडायस का सगळे बघतील उगाच. त्याला थोडं दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याने अजूनच घट्ट पकडलं. हळूच आत हात टाकून ड्रेस वर केला आणि पोटावर हात ठेवला. आई गं.. किती थंड वाटलं. अंगावर काटे आले सगळे. सोड ना म्हणलं तर ऐकेना. मलाही ते हात सोडवू वाटत नव्हते...

थोड्यावेळाने पाऊस उघडला आणि आम्ही निघायचं ठरवलं. गाडीचं सीट ओलं झालेलं. हा शहाणा माझ्या ओढणीने पुसू लागला. थांब म्हणलं आणि बँगेतून रुमाल दिला काढून.. टांग टाकली आणि गाडी स्टार्ट केली. याला घट्ट पकडून बसले आणि पुढचा प्रवास सुरु. लेणी अजून ३२ किमी लांब होत्या...

#क्रमशः

- अभिनव ब. बसवर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कधी आठवण नाही येत त्याची ?

कधी आठवण नाही येत त्याची ? येते तर, आठवण कशी नाही येणार. माझ्या तरुणपणातील कित्येक वर्षं मी त्याच्यासोबत घालवलीयेत. पुरूषाचा पहिला स्पर्श त्याच्याकडूनचं अनुभवलाय. खूप छान होतं सगळं. विकेंड ला फिरायला जाणं, रात्री उगाच सगळे रस्ते फिरणं, त्याच्यासोबत रस्त्यावर ओरडणं, कधी गुपचूप दारू आणणं, रुमवर जाऊन दोघांनीचं पिणं, त्यानंतर एकमेकांचा हवाहवासा सहवास अनुभवनं, दररोज काहीतरी वेगळी पोजिशन ट्राय करणं. आम्ही दोघंही सेक्स च्या बाबतीत शौकीन होतो. प्रत्येक क्षण मेमरेबल कसा जगता येईल याचं दोघांनाही भान असायचं. कधी कधी पोर्न फिल्म्स लँपीवरती प्ले करूनसुद्धा आम्ही सेक्स ट्राय करायचो. वेगळीच मजा होती ती.  त्याचा १ बीएचके होता. पुण्यात सोफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला, उत्तम कमवायचा. वेल सेटल्ड. मी पीजी राहायचे, ईथेचं पर्वतीला. कंपनीच्या कामानिमित्त ओळख झाली, कधी एकमेकांना आवडू लागलो लक्षातच नाही आलं. दिसायला स्मार्ट, कोणतीही मुलगी लगेच प्रेमात पडावी असाच होता. माझा जाँब वेल सेटल्ड झाल्यानंतर लग्न करायचं ठरवलं. उत्तम पार पडलं. सुरुवातीला थोडा आला प्रोब्लेम. मी पक्की मराठी घरातील. तो मुळचा राजस्थानी....

तिच्यासोबतची पहिलीच ट्रीप : भाग १

मोठ्या मुश्किलीनं ती माझ्यासोबत फिरायला यायला तयार झाली. मुळची इथलीचं असल्यानं बाहेर पडायचं म्हणलं तरी कोणीतरी बघेल याचं टेंशन असायचं. तोंडाला स्टोल गुंडाळूनचं यायची. थोडासा खाली कर म्हणलं तरी ऐकायची नाही. नको कोणीतरी पाहिलं तर नसती लफडी मागे लागतील. इतकी सुंदर दिसते पण प्रत्यक्ष चेहर्याचं दर्शन विरळचं. माझं मन राखण्यासाठी हळूच स्टोल खाली करते तेव्हा नाकावर बारीकसा व्रण दिसतो. चेहऱ्यावर थोडीसुद्धा धूळ नाही. डोळे कोरल्यासारखे वाटतात, ओठ अगदी चमकतात. बोलताना तिच्या जिभेच्या शेंड्यावरचं माझं लक्ष. मुद्दामूनचं मी आईस्क्रीम पार्लरला भेटायचं ठरवतो कारण, का कुणास ठाऊक ती जीभ जास्त मोहात पाडते.... लेणी पाहायला जायचं ठरलं. माझा रुममेट सोबत यायला तयार झाला. कारण इतक्या लांब जायचं तर कोणी सोबत हवंच. दुसर्यादिवशी सकाळी सातला निघायचं होतं. रात्रभर जागण्याची घाण सवय.त्यात आम्ही दोघ रात्री लँपीवर मुव्ही पाहत बसलो. सकाळी कुठली लवकर जाग येतेय. तिचाच उठवण्यासाठी कॉल आला. ताडकन उठलो. चार मग अंगावर ओतले आणि भसाभस परफ्युम मारला. ठरल्या वेळेच्या आधी सितारा चौकात पोहचलो. चहा घेतला. मित्राने सकाळ सकाळी सिग...

तिच्यासोबतची पहिलीच ट्रीप : भाग ३

ओल्याचिंब अंगाने ती मला चिकटून बसल्यानंतर क्षणभर सगळ्या गोष्टींचा विसर पडला. त्यात पावसाच्या बारीक सरी चालूच. तोंडावर पाण्याचे थेंब लागत असल्याल्यामुळे अंग आकसून घेऊन ती माझ्या मागे लपली. नाकातून पाणी टपकु लागलं. चिखलाचे शिंतोडे उडून ड्रेस राड झालेला. अंगाला ड्रेस चिकटल्यामुळे सगळं पाणी पाणी. नशीब तिने आतमधून स्लीप घातलेली नाहीतर सगळाच पचका झाला असता. माझेही हाल काही वेगळे नव्हते. टी शर्ट पूर्णपणे भिजलेला. गाडी चालवताना कुडकुडू लागलो... तिने माझ्या टी शर्टच्या आतमध्ये हात टाकला तसा मी एकदम शहारलो. काहीच सुचलं नाही. फक्त तिचा स्पर्श. हात पोटावरून छातीकडे सरकला तसा माझाही तोल ढासळत होता. वेगळीच जादू. हरवून गेलो त्यात. पूर्णपणे भिजलीयस तू. थांबुयात का आपण. अशाने सर्दी होईल. लेणी जवळच आल्यामुळे आम्ही तसचं जाण्याचं ठरवलं. अगदीच चिकटून बसल्यामुळे डाव्या डोळ्याच्या कोपर्यातून तिचा पाय मला दिसला. गुडघ्यापासून खाली पाणी ओघळत होत. ड्रेसचं कापड पोटर्याना चिकटलेलं. पायातला काळा दोरा त्या गोर्यापान रंगावर उठून दिसला. बोटं आकडून घेतलेली. अंगठ्याची उरलेल्या बोटांशी सततची चुळबुळ. मोह आवरला नाही म्ह...