बांधाच्या पलीकडे लघवीला बसल्यानंतर खरंतर मला जाम भीती वाटली. एकतर ती झाडी आणि एकसारखा किर्रर्र करणारा किड्यांचा आवाज. याआधी देखील लहानपणी आईवडिलांसोबत फिरायला वगैरे जायचे तेव्हा असचं उघड्यावरच बसावं लागायचं. पर्याय नसायचा. एकतर टोयलेट नसायची आणि तसंच थांबवून ठेवावं तर पोटात प्रचंड दुखायचं. नेहमी आई सोबत असायची. यावेळी हा पाठमोरा थांबलेला. विश्वासाचं नातं किती पटकन तयार झालं ना आमच्यात.सुमसाम रस्त्याला असं जास्त वेळ थांबणं बरं नाही म्हणून आम्ही निघालो...
ओढणी सारखी खाली सरकून चाकाकडे जायची म्हणून तिला गाठचं मारली. वैतागचं असतो या पंजाबी ड्रेसचा. ओढणी सांभाळा.पोटाजवळ नाडी रुतते आणि सगळं लाल होऊन जातं. जिन्स घालणार होते पण या ड्रेसमध्ये मी जास्त छान दिसते. कानातलं वगैरे बिलकुल आवडत नाही. आई ओरडली तरी बिंदी लावत नाही पण आज याच्यासाठी तर इतकं आवरून आले. केसांना जेल लावण्याची याला फारच घाण सवय. कसले कडक होऊन गेलेत केस. हात टाकला तर उगाच विस्कटू नको म्हणतो. डोंबलाचे सेट केलेत. याला माझ्यासाठी साधं नटता येत नाही वाटतं. झोपेतून तसाच उठून आलाय. बड्डेला छानसा परफ्युम गिफ्ट करणार . कुठून आणलाय असला भंगार परफ्युम काय माहित. नाकामध्ये वास जाऊन डोकं जाम झालं सगळं...
मैत्रिणीच्या वाढदिवसाला चाललेय म्हणून घरी सांगितलेलं. इतकं आवरलेलं बघून शॉक बसला ना आईला.आमच्या भैय्याचा मध्येच चोमडा प्रश्न, “नक्की मैत्रिणीकडेच चाललीये ना ?” याला नसत्या चौकश्या. बघेल तेव्हा नवीन पोरीसोबत फिरताना दिसतो. परवा तर सायलीने माँल मध्ये कुठल्यातरी पोरीसोबत पाहिलं. पिक्चरला गेलेला. गुडघ्यापर्यंत ड्रेस घालून आलेली. याचे सतराशे साठ नखरे पण माझ्यावर बारीक लक्ष. हा मुलगा कोण, तो कोण. जास्त मैत्री करू नको. असं नि तसं...
गाडीवर बसून बसून अंग दुखतं सगळं. त्यात याची स्पोर्ट्स बाईक. मागचं सीट नेमकं वर. घट्ट धरूनच बसावं लागतं. सारखी याच्यावर मी आदळायचे. पाठीत चमक भरू नये म्हणजे झालं. मानेवर किस केली तर अंग आकसून घेत होता. नाही तेव्हा फोनवर मला पाहिजे पाहिजे करतो. आता स्वतःहून किस करतेय तर लाजतो. मुलांचं हे असं असतंं. यांना समोरून चालत आलं तर घेऊ नाही वाटत. इतकं छान वातावरण. थंड वारं, आजूबाजूला झाडं सगळी. माणसाने प्रेमाच्या गप्पा माराव्यात ना. साहेब मित्रांशी झालेली भांडणं सांगत बसलेत. किती अरसिक बॉयफ्रेंड मिळाला रे देवा...
घाटाचा रस्ता लागला आणि आम्ही गाडी स्लो घेतली. समोरून एकदम बस वगैरे यायची. जवळ येईपर्यंत कळायचं नाही. एखादी कार चाटून ओव्हरटेक करून जायची. पावसाचे बारीक शिंतोडे लागत होते. मला भिजण्याचं टेंशन आलं. उगाच भिजले तर सगळा ड्रेस अंगाला चिकटून बसेल. एक चांगला स्पॉट दिसला आणि आम्ही थांबलो. चहाची टपरी आणि वडापावची गाडी होती. दोघांनी मस्त पत्र्याचं शेड टाकलेलं. पावसाचा जोर वाढला आणि पटकन आम्ही आडोशाला गेलो. मागच्या बाजूला खोल दरी होती. त्या स्पॉट वरून चार डोंगर एका रांगेत दिसायचे. पावसामुळे तर अजूनच भारी वाटत होतं ते. तीन चहा सांगितले सोबत वडापाव. पाव खाऊ की नको. परत पोटाचा त्रास व्हायचा. जाऊ दे, कोण रोज रोज येणार आहे. करूयात मस्त मजा. दाबून एक वडापाव खाल्ला. सोबत मिरची. डोळ्यातून पाणी नुसतं...
आ करून पावसाचे शिंतोडे जिभेवर पडतायत का, हा वेडेपणा देखील करून पाहिला. जास्तच थंडी वाजू लागली. मी ज्याकेट घातलं. मागून येऊन अचानक याने ज्याकेटच्या खिशात हात घातले. अलगद चिकटला अंगाला. वेडायस का सगळे बघतील उगाच. त्याला थोडं दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याने अजूनच घट्ट पकडलं. हळूच आत हात टाकून ड्रेस वर केला आणि पोटावर हात ठेवला. आई गं.. किती थंड वाटलं. अंगावर काटे आले सगळे. सोड ना म्हणलं तर ऐकेना. मलाही ते हात सोडवू वाटत नव्हते...
थोड्यावेळाने पाऊस उघडला आणि आम्ही निघायचं ठरवलं. गाडीचं सीट ओलं झालेलं. हा शहाणा माझ्या ओढणीने पुसू लागला. थांब म्हणलं आणि बँगेतून रुमाल दिला काढून.. टांग टाकली आणि गाडी स्टार्ट केली. याला घट्ट पकडून बसले आणि पुढचा प्रवास सुरु. लेणी अजून ३२ किमी लांब होत्या...
#क्रमशः
- अभिनव ब. बसवर
ओढणी सारखी खाली सरकून चाकाकडे जायची म्हणून तिला गाठचं मारली. वैतागचं असतो या पंजाबी ड्रेसचा. ओढणी सांभाळा.पोटाजवळ नाडी रुतते आणि सगळं लाल होऊन जातं. जिन्स घालणार होते पण या ड्रेसमध्ये मी जास्त छान दिसते. कानातलं वगैरे बिलकुल आवडत नाही. आई ओरडली तरी बिंदी लावत नाही पण आज याच्यासाठी तर इतकं आवरून आले. केसांना जेल लावण्याची याला फारच घाण सवय. कसले कडक होऊन गेलेत केस. हात टाकला तर उगाच विस्कटू नको म्हणतो. डोंबलाचे सेट केलेत. याला माझ्यासाठी साधं नटता येत नाही वाटतं. झोपेतून तसाच उठून आलाय. बड्डेला छानसा परफ्युम गिफ्ट करणार . कुठून आणलाय असला भंगार परफ्युम काय माहित. नाकामध्ये वास जाऊन डोकं जाम झालं सगळं...
मैत्रिणीच्या वाढदिवसाला चाललेय म्हणून घरी सांगितलेलं. इतकं आवरलेलं बघून शॉक बसला ना आईला.आमच्या भैय्याचा मध्येच चोमडा प्रश्न, “नक्की मैत्रिणीकडेच चाललीये ना ?” याला नसत्या चौकश्या. बघेल तेव्हा नवीन पोरीसोबत फिरताना दिसतो. परवा तर सायलीने माँल मध्ये कुठल्यातरी पोरीसोबत पाहिलं. पिक्चरला गेलेला. गुडघ्यापर्यंत ड्रेस घालून आलेली. याचे सतराशे साठ नखरे पण माझ्यावर बारीक लक्ष. हा मुलगा कोण, तो कोण. जास्त मैत्री करू नको. असं नि तसं...
घाटाचा रस्ता लागला आणि आम्ही गाडी स्लो घेतली. समोरून एकदम बस वगैरे यायची. जवळ येईपर्यंत कळायचं नाही. एखादी कार चाटून ओव्हरटेक करून जायची. पावसाचे बारीक शिंतोडे लागत होते. मला भिजण्याचं टेंशन आलं. उगाच भिजले तर सगळा ड्रेस अंगाला चिकटून बसेल. एक चांगला स्पॉट दिसला आणि आम्ही थांबलो. चहाची टपरी आणि वडापावची गाडी होती. दोघांनी मस्त पत्र्याचं शेड टाकलेलं. पावसाचा जोर वाढला आणि पटकन आम्ही आडोशाला गेलो. मागच्या बाजूला खोल दरी होती. त्या स्पॉट वरून चार डोंगर एका रांगेत दिसायचे. पावसामुळे तर अजूनच भारी वाटत होतं ते. तीन चहा सांगितले सोबत वडापाव. पाव खाऊ की नको. परत पोटाचा त्रास व्हायचा. जाऊ दे, कोण रोज रोज येणार आहे. करूयात मस्त मजा. दाबून एक वडापाव खाल्ला. सोबत मिरची. डोळ्यातून पाणी नुसतं...
आ करून पावसाचे शिंतोडे जिभेवर पडतायत का, हा वेडेपणा देखील करून पाहिला. जास्तच थंडी वाजू लागली. मी ज्याकेट घातलं. मागून येऊन अचानक याने ज्याकेटच्या खिशात हात घातले. अलगद चिकटला अंगाला. वेडायस का सगळे बघतील उगाच. त्याला थोडं दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याने अजूनच घट्ट पकडलं. हळूच आत हात टाकून ड्रेस वर केला आणि पोटावर हात ठेवला. आई गं.. किती थंड वाटलं. अंगावर काटे आले सगळे. सोड ना म्हणलं तर ऐकेना. मलाही ते हात सोडवू वाटत नव्हते...
थोड्यावेळाने पाऊस उघडला आणि आम्ही निघायचं ठरवलं. गाडीचं सीट ओलं झालेलं. हा शहाणा माझ्या ओढणीने पुसू लागला. थांब म्हणलं आणि बँगेतून रुमाल दिला काढून.. टांग टाकली आणि गाडी स्टार्ट केली. याला घट्ट पकडून बसले आणि पुढचा प्रवास सुरु. लेणी अजून ३२ किमी लांब होत्या...
#क्रमशः
- अभिनव ब. बसवर

Simply great.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSend me ur blog links using blog as madhuri dahale
ReplyDelete